Tuesday, June 5, 2012

संध्याकाळ


आयुष्याच्या नभात एखादी काळी छटा तर असणारच,
पण मावळतीला जाताना साऱ्या आसमंतात, सप्तरंगाची उधळण करता येईल का?
ओबड-धोबड विखुरलेले अपेक्षांचे दगड-धोंडे,
हलकेच तरंगून सायंकाळची गोडी वाढवतील का?
दूर पैलतीरावर जाताना, आयुष्याच्या नौकेला मधेच थोडा संथपणा सापडेल का?
किनाऱ्यावरील लांबूनच चालणारे बघे, क्षणभर थबकून पाहतील का?
काळ्या, पांढऱ्या, लाल आणि निळ्या, रंगांना एकत्र आणणारी ही संध्याकाळ,
मला देखील गवसेल का? मला देखील गवसेल का?
- परसुराम

No comments:

Post a Comment