Sunday, April 1, 2012

So-lit-itude


अपयश, संकटे, अडचणी, तंगी, निराशा;
किर्र रात्रीच्या काळोखालाही एवढ्या छटा कशा?

जेव्हा असा काळोख दाटतो,
गर्दीतही मग मी एकटा वाटतो,
सभोवताली जेव्हा नजर टाकतो,
प्रत्येकाची हीच दैना अनुभवतो.

कुणी पडत असतो, कुणी रडत असतो,
कुणी लडखडत असतो,
तर कुणीतरी नुसताच थक्क बसून असतो.

तरीही जगाचा व्यवहार चालतोय,
रोज कोणीतरी हारतो, पण रोजच कोणीतरी नक्कीच जिंकतोय.
यांना जगायला एवढा हुरूप कुठून मिळतोय?
कोण आहे जो सर्वांना सावरतोय?

"कोण" नाही रे बांगडू, "काय" असं विचार,
अंतरमनाने दिला काव्याला फटकार,
गीते पासून लौस्त सिम्बल चा सार,
स्वयंचेतना आहे ईश्वराचा अवतार.

आपला हुरूप, आपले धैर्य, आपले परिश्रम,
आपला विश्वास आणि आपलाच संयम.

रात्र अंधारलेली असेल जरी,
याच सद्गुणांनी चार्ज राहते सर्वांची बेटरी,
सर्वांच्यातच ही ज्योत तेवत आहे, अंतरमनात डोकावून जरा पहा तरी !!

ती ज्योत जेव्हा उमगेल,
आकाशातला तो चंद्र ही मग अगदी डोक्यावरच भासेल,
गर्द काळोखातही मग आपलाच जलवा असेल,
सगळंच जग मग आपलंसं भासेल.

कमरेवर हात ठेवून मग ऐटीत उभे राहू,
बघ्यांच्या गर्दीला मग आपल्या साऱ्या करामती दावू,
उजेडाचा हात मग इतरांनाही देऊ,
हसत-खेळत-नाचत-बागडत मग अंधार सारा कोळून पिऊ.

- परसुराम