Thursday, June 28, 2012

बागेतली ही वाट

इवली पाऊले हेंदकाळतात आणि सावरतात,
किलबिल पाऊले दौडतात-धडपडतात.

सुरकुतलेले काठ्या टेकत जातात,
थकलेले धापा टाकीत जातात.

यौवनात पुढे मागे घुमतात,
तारुण्यात कुशीत सामावतात आणि गातात.

कधी खिदळून गप्पा टाकीत जातात,
कधी हिरमुसून अबोला साधीत जातात.

सकाळी व्यायाम करीत चालतात,
सायंकाळी भेळ चाखत हिंडतात,
रात्री आईस्क्रीम सोबत पाघळतात.    

जितकी पाऊले, तितक्या तऱ्हा,
कधी ऊन तर कधी पाऊस-वारा,
बागेतली ही वाट,
रोजच खेळ पाहते हा सारा.

- परसुराम

No comments:

Post a Comment