रडतराव रडत जाऊन बसले घोड्यावर,
अश्रुंचे लोंढे ओघळू लागले, त्यांच्या गालावर.
हु नाही, चू नाही, पीछे नाही, आगे नाही,
रडतरावांना लागली होती फक्त, रडण्याची घाई.
रडतराव रडत जाऊन बसले घोड्यावर,
घोडा दौडत घेऊन गेला, त्यांना वेशीवर.
वेशीवर जमा झाले बारा बलुतदार,
पुसू लागले काय झाले सांगा एक वार.
घोडा दौडत घेऊन गेला, त्यांना वेशीवर.
वेशीवर जमा झाले बारा बलुतदार,
पुसू लागले काय झाले सांगा एक वार.
रडतराव पाहिजे का तुम्हा शेला भारदार,
तुमच्याचसाठी की हो आम्ही मांडलाय हा बाजार.
रडतराव बोला खाणार का जिलेबी चवदार,
एकदा खाल तर परत परत मागाल वारंवार.
रडतराव मोजडी पहा कशी टोकदार,
पाहून कोणीही म्हणेल कोण आला हा सुभेदार.
हुश्श, थकून गेले सारे, बेजार झाले सारे,
सोसून या रडतरावांचे नखरे.
या गोंधळात एक कुंभार-दादा पण होता बरे,
शांतपणे दुकानात फिरवीत होता त्याच्या कारागिरीची चक्रे.
रडतराव हे पहा, निवांतपणे कुंभार-दादा म्हणाला,
रडतराव हे पहा, निवांतपणे कुंभार-दादा म्हणाला,
ताज्या-ओल्या मातीची एक मूर्ती घेऊन तो आला.
ताज्या-ओल्या मातीची एक मूर्ती घेऊन तो आला.
आहे ना हुबेहूब हा चेहरा तुमच्या सारखा,
आहे ना हुबेहूब हा चेहरा तुमच्या सारखा,
समोर सारी चंगळ, परी आनंदास पारखा.
समोर सारी चंगळ, परी आनंदास पारखा.
मूर्ती पाहिली आणि रडतरावांना उमगले,
मूर्ती पाहिली आणि रडतरावांना उमगले,
आपली छबी आपणच बनवतो गलगले.
जगाला जो चेहरा दाखवू,
जग त्याचीच प्रतिमा बनवेल,
जगाला जो चेहरा दिसेल,
त्यावरच आपली प्रतिभा ठरवेल.
हसू लागले रडतराव, दिले स्वतःहाला वचन,
हसू लागले रडतराव, दिले स्वतःहाला वचन,
या मूर्ती सारखा चेहरा परत पाडायचा नाही आपण.
या मूर्ती सारखा चेहरा परत पाडायचा नाही आपण.
घेतली त्यांच्या मनाने उभारी,
दौडले घेऊन ते उंच भरारी,
नुकताच असं ऐकण्यात आलंय,
नुकताच असं ऐकण्यात आलंय,
लोक म्हणू लागलेत त्यांना, हसमुख सवारी.
- परसुराम
No comments:
Post a Comment