Thursday, June 28, 2012

बागेतली ही वाट

इवली पाऊले हेंदकाळतात आणि सावरतात,
किलबिल पाऊले दौडतात-धडपडतात.

सुरकुतलेले काठ्या टेकत जातात,
थकलेले धापा टाकीत जातात.

यौवनात पुढे मागे घुमतात,
तारुण्यात कुशीत सामावतात आणि गातात.

कधी खिदळून गप्पा टाकीत जातात,
कधी हिरमुसून अबोला साधीत जातात.

सकाळी व्यायाम करीत चालतात,
सायंकाळी भेळ चाखत हिंडतात,
रात्री आईस्क्रीम सोबत पाघळतात.    

जितकी पाऊले, तितक्या तऱ्हा,
कधी ऊन तर कधी पाऊस-वारा,
बागेतली ही वाट,
रोजच खेळ पाहते हा सारा.

- परसुराम

Sunday, June 24, 2012

Blissful Serenity


As the Halo over this serenity grows,
heavens start pouring and the ocean bows.

Angels arrive to walk the shores,
Mermaids gather to sing the lores.

Elves in the ships begin to dance,
Fairies in shiny gear begin romance.

A sight so pure,
a sight so magical,
a sight so beautiful,
What can I say, this life is so blissful.

- Parsooram

Saturday, June 23, 2012

Someday ..


Someday, I will be out there,
That day, I will rule.

Someday, the Jungle will call,
That day, I will roar.

Someday, they will face me,
That day, I will hunt.

Someday, they will race me,
That day, I will win.

Someday, my stripes will shine,
That day, I will be king.

Someday, I will leave this cave,
to chase my horizon,
to make my mark,
to catch my view outside this window.

That day, my dreams will begin...

- Parsooram


Wednesday, June 20, 2012

कमळ पुष्प


झाली कितीही चिखलफेक,
तरी मी ढळणार नाही.
 
अडचणींच्या दलदलीमध्ये,
थकून मी बुडणार नाही.
 
प्रत्येक पाकळीस माझ्या,
मी बहारणार अन निखारणार.
 
कमळ पुष्प आहे मी,
सारे सरोवर फुलवणार.
 
- परसुराम

Monday, June 18, 2012

Dreams


Dreams bring us toghether,
and sometimes, we dream together.

Dreams fill our entire lives,
and sometimes, our life becomes a dream.

Dreams are our companions of times,
and sometimes, companions bring us good times.

Dreams bring out the impossible,
and sometimes, possibilities become endless.

Dreams, lush with all meadows and trees,
and sometimes, we are dancing with the bees.

Dreams, of cars, of bungalows and gardens,
of salaries, travels and of holiday.

and sometimes, of you and of me,
sitting on a bench, holding hands all day.

- Parsooram

रडतराव घोड्यावर


रडतराव रडत जाऊन बसले घोड्यावर,
अश्रुंचे लोंढे ओघळू लागले, त्यांच्या गालावर.
हु नाही, चू नाही, पीछे नाही, आगे नाही,
रडतरावांना लागली होती फक्त, रडण्याची घाई.

रडतराव रडत जाऊन बसले घोड्यावर,
घोडा दौडत घेऊन गेला, त्यांना वेशीवर.
वेशीवर जमा झाले बारा बलुतदार,
पुसू लागले काय झाले सांगा एक वार.

रडतराव पाहिजे का तुम्हा शेला भारदार,
तुमच्याचसाठी की हो आम्ही मांडलाय हा बाजार.
रडतराव बोला खाणार का जिलेबी चवदार,
एकदा खाल तर परत परत मागाल वारंवार.

रडतराव मोजडी पहा कशी टोकदार,
पाहून कोणीही म्हणेल कोण आला हा सुभेदार.
हुश्श, थकून गेले सारे, बेजार झाले सारे,
सोसून या रडतरावांचे नखरे.

या गोंधळात एक कुंभार-दादा पण होता बरे,
शांतपणे दुकानात फिरवीत होता त्याच्या कारागिरीची चक्रे.

रडतराव हे पहा, निवांतपणे कुंभार-दादा म्हणाला,
रडतराव हे पहा, निवांतपणे कुंभार-दादा म्हणाला,
ताज्या-ओल्या मातीची एक मूर्ती घेऊन तो आला.

आहे ना हुबेहूब हा चेहरा तुमच्या सारखा,
आहे ना हुबेहूब हा चेहरा तुमच्या सारखा,
समोर सारी चंगळ, परी आनंदास पारखा.

मूर्ती पाहिली आणि रडतरावांना उमगले,
मूर्ती पाहिली आणि रडतरावांना उमगले,
आपली छबी आपणच बनवतो गलगले.

जगाला जो चेहरा दाखवू,
जग त्याचीच प्रतिमा बनवेल,
जगाला जो चेहरा दिसेल,
त्यावरच आपली प्रतिभा ठरवेल.

हसू लागले रडतराव, दिले स्वतःहाला वचन,
हसू लागले रडतराव, दिले स्वतःहाला वचन,
या मूर्ती सारखा चेहरा परत पाडायचा नाही आपण.

घेतली त्यांच्या मनाने उभारी, 
दौडले घेऊन ते उंच भरारी,
नुकताच असं ऐकण्यात आलंय,
लोक म्हणू लागलेत त्यांना, हसमुख सवारी.

- परसुराम  

Thursday, June 14, 2012

आठवणीतील तो बाक

आयुष्यात रंगी-बेरंगी छटांचे मनोरे उभे करताना,
मनातल्या एका कप्प्यात साचून राहतात खूप साऱ्या आठवणी.
आणि कधी अलगद तो कप्पा उघडला की दिसतो एक बाक,
साधाच, लाकडाचा, असा एक बाक.

बागेत गेलो की खेळायला बेफान सुटायचो खरं,
पण त्या बेधुंद बागडण्याला ही अवसान द्यायची,
कोपऱ्यातल्या बाकावर आपल्याकडेच लक्ष ठेवून असलेली आपली आई.

शाळेमध्ये याच बाकावर कर्कटक ने रेघा ओढून हद्द ठरवली,
आणि याच बाकावर थोडंसं अजून आत सरकून जीवाच्या मैतरासाठी जागा बनवली.

कॉलेजमध्ये याच बाकावर मित्रांचा कट्टा रंगला,
याच बाकावर बसून पोरींना शिट्ट्या घातल्या,
आणि अशाच बाकावर फुटले प्रेमाला अंकुर.

आज निवांतपणा शोधताना जाणवलं,
क्युबिकलच्या गर्दीत हा बाक कुठे तरी हरवलाय,
गलगले पण तुम्ही काळजी नका करू,
तो परत मांडण्यासाठीच हा आठवणींचा कप्पा उघडलाय :-)

- परसुराम

प्यास

सारा समंदर मेरे पास है, एक बुंद पाणी मेरी प्यास है !!
I have the whole ocean lying in my feet, and yet what I crave for is a single drop of water

Tuesday, June 5, 2012

संध्याकाळ


आयुष्याच्या नभात एखादी काळी छटा तर असणारच,
पण मावळतीला जाताना साऱ्या आसमंतात, सप्तरंगाची उधळण करता येईल का?
ओबड-धोबड विखुरलेले अपेक्षांचे दगड-धोंडे,
हलकेच तरंगून सायंकाळची गोडी वाढवतील का?
दूर पैलतीरावर जाताना, आयुष्याच्या नौकेला मधेच थोडा संथपणा सापडेल का?
किनाऱ्यावरील लांबूनच चालणारे बघे, क्षणभर थबकून पाहतील का?
काळ्या, पांढऱ्या, लाल आणि निळ्या, रंगांना एकत्र आणणारी ही संध्याकाळ,
मला देखील गवसेल का? मला देखील गवसेल का?
- परसुराम