Saturday, October 8, 2011

Sliding down the memory lane

प्रिया माझी आज बागेत भेटली,
आधी बिलगली, मग सावरली,
हळूच म्हणाली ..
हळूच म्हणाली, चल खेळू एक नवीन खेळ,
बालपणीच्या आठवणींनी होऊया अलबेल.

काळ्या-पांढऱ्या आठवणींची घसरगुंडी झाली तयार,
मी ही झालो मग त्या स्वच्छंद लाटेवर सवार,
हरवून गेले भान, विरून गेला काळ,
दिसू लागला फक्त आमच्या घरामागचा माळ.

सैर भैर बागडताना अचानक तिथे पडलेली माझी सायकल दिसली,
जमिनीवरून तिला उचलले आणि लगेच सीटवर टांग मारली.

घराजवळ येताच ब्रेक दाबला - पायाने,
एकदा, दोनदा, चारदा .. पुरता बेजार झालो मी ब्रेक न लागल्याने.
आणि तेव्हाच अचानक भान उमगले,
अहो ही कार नाहीये गलगले!!
नुसत्या विचारानेच मन शहारले,
सायकलला तिथेच टाकले आणि जोरात अंग झटकले,
एका सुखद आठवणीचा सुगंध अनुभवून,
फुलपाखरू झालेले मन पुन्हा माणसात आले.
- परसुराम

No comments:

Post a Comment