Saturday, October 8, 2011

Marina Bay Sands

काळोख्या रात्री अशा,
माझे एकलेपण सैर भैर धावते.
कधी रातकिड्यांची किर्र ऐकते,
कधी कूस बदलण्याचे खेळ करते,
आणि उगीच कधी तरी स्वप्नांच्या गावी भुलते.

आज गेले ते ताऱ्यांच्या गावा.
काय तो झगमगाट, काय तो लखलखाट,
आणि काय ती मनाला भुरळ घालणारी हवा.

हरखून, हरवून, हरपून गेलं माझं एकलेपण,
प्रकाशाच्या पाऊसात न्हाऊन गेलं माझं मन,
आणि अचानक एक विचार आला -
या ताऱ्यांना ही झगमग दिली तरी कोणी? चल पाहू, आहे कोणी देव, यक्ष कि मुनी?

चालू लागले माझे मन -
एका प्रकाशाच्या दिशेने, एका चमत्काराच्या आशेने.

टुमदार, सुंदर एक महाल दिसला - महालाला तीन मनोरे,
हजारो खिडक्या आणि शेकडो दारे,
आणि त्याच्याच खिडकीतून डोकावत होते,
आकालाशाला गवसणी घालणारे निखारे.

युरेका, युरेका मनात आनंद दरवळला,
ताऱ्यांचा उगम त्याने याची डोळा पाहिला.

तितक्यात, कॅनौट ला, कॅनौट ला - अस्सल सिंगापुरी आवाज घुमला.
तेव्हा उमगले - एकटेपणाच्या अंधारात पंख फुटले होते कल्पना विस्ताराला,
आणि नकळत आपल्याच धुंदीत मी पोहोचलो होतो मरीना बे सेन्ड्सला.

- परसुराम

No comments:

Post a Comment