Tuesday, January 10, 2017

क्षणभंगुर


ती सुंदर, ती सालस,
ती कमनीय, ती लोभस,
ती चंचल, ती निरागस,
ती अप्सरा, ती स्वप्नसुंदरी, ती प्रिया !

तिचे सौंदर्य त्याला साठवून ठेवायचे होते .. युगानुयुगे !!

कलेला वाव मिळाला,
पाषाणाला आकार मिळाला,
रंग, रूप, बांधा, अलंकार,
त्याच्या हृदयातील भावना .. झाली साकार !!

युगानुयुगांचे ठाऊक नाही,
पण अश्याच एका काळरात्री यवनांचा थवा आला,
आणि चिरंतन, अजरामर अशी छबी ठरली .... क्षणभंगुर !!

- परसूराम 

No comments:

Post a Comment